अभिनेत्री स्वानंदी टिकेकर 25 डिसेंबर 2023 रोजी गायक आशिष कुलकर्णी सोबत लग्न झाले.

सध्या यांच्या मेहंदी, संगीत आणि लग्न सोहळ्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

स्वानंदी-आशिषने जुलै महिन्यात त्यांच्या प्रेमाची कबुली देत अगदी थाटामाटात साखरपुडा केला होता.

त्यांच्या लग्नाला त्यांनी 'आनंदी' हा हॅशटॅग वापरला. आशिष-स्वानंदी या दोन नावांचे मिळून त्यांना हा हॅशटॅग बनवलाय.

तसेच लग्नात अभिनेत्री स्वानंदीने खास उखानाही घेतला आहे.

स्वानंदीने उखाणा घेत म्हटलंय की "मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर-माहेरची खूण आशिषचं नाव घेते कुलकर्ण्यांची सून."

अभिनेत्री स्वानंदी टिकेकर ही प्रसिद्ध मराठी अभिनेते उदय टिकेकर यांची मुलगी आहे.

तसेच स्वानंदी टिकेकर हिची आई 'आरती अंकलीकर' शास्त्रीय गायिका आहे.

आई आणि वडिलांप्रमाणेच स्वानंदी ही अभिनेत्री तसेच गायिका आहे.

कदाचित यामुळेच तिचे गायक आशिष कुलकर्णी सोबत प्रेम जुळले असावे.

अभिनेत्री स्वानंदी आणि गायक आशिष यांचे लग्न झाल्याबद्दल अभिनंदन आणि सुभेच्छा.