'देवयानी' ही गाजलेली मालिका आणि 'बिग बॉस मराठी' या प्रसिद्ध शो मध्ये झळकलेली मराठी अभिनेत्री शिवानी सुर्वे हिचे अभिनेता अजिंक्य ननावरे सोबत लग्न झाले आहे.

शिवानी सुर्वे आणि अजिंक्य ननावरे यांनी 31 जानेवारीला 2024 रोजी गुपचूप साखरपुडा उरकला. 

आणि आता नुकतंच 1 फेब्रुवारीला ठाण्यात त्यांचा विवाहसोहळा पार पडला.

अभिनेत्री शिवानी सुर्वे ही 'झिम्मा 2' या चित्रपटात झळकली होती, त्यामुळे या चित्रपटातील अनेक कलाकार शिवानीच्या लग्नास उपस्थित होते. 

शिवानी सुर्वे आणि अजिंक्य ननावरे या दोघांची पहिली भेट 'तू जीवाला गुंतवावे' या मालिकेच्या सेटवर झाली होती.

यानंतर शिवानी आणि अजिंक्य या दोघांची मैत्री झाली आणि पुढे मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. 

2017 पासून शिवानी आणि अजिंक्य एकमेकांना डेट करत होते आणि आता हे दोघेही लग्नबंधनात अडकले आहे.

अभिनेत्री शिवानी ही 'बिग बॉस मराठी' या प्रसिद्ध शो मध्ये झळकली होती. त्यामुळे बिग बॉस मध्ये झळकलेले अनेक कलाकार तिच्या लग्नास हजर होते.

माधव देवचक्के, नेहा शितोळे, मेघा धाडे यांच्या सोबतच इतरही अनेक मराठी कलाकार या लग्नास हजर होते.

शिवानी सुर्वे आणि अजिंक्य ननावरे या दोघांचेही लग्न झाल्याबद्दल अभिनंदन आणि पुढील आयुष्यासाठी सुभेच्छा.