लावणी डान्सर आणि मराठी अभिनेत्री मेघा घाडगे ही सध्या आजारी असल्याने हॉस्पिटल मध्ये अॅडमिट झालीय.

यामुळे नुकतंच अभिनेत्री मेघा घाडगेचा हॉस्पिटल मध्येच वाढदिवस साजरा झाला.

थेट हॉस्पिटलमध्ये केक घेऊन जात तिच्या कुटुंबीयांनी तिचा वाढदिवस साजरा केलाय.

मेघाने हॉस्पिटल मधून शेअर केलेल्या वाढदिवसाच्या या फोटोनी सर्वांचे लक्ष वेधून घेतलंय.

तिच्या या पोस्टवर अनेक प्रेक्षकांनी कमेंट करत, तिला वाढिदवसाच्या शुभेच्छा दिल्याय तसेच तिला लवकर बरं होण्यास आणि काळजी घेण्यास सांगितलं आहे.

अभिनेत्री मेघा घाडगे ही प्रसिद्ध लावणी डान्सर म्हणून ओळखली जाते. तिचे अनेक डान्स व्हिडीओही व्हायरल होत असतात.

पण अनेक चित्रपटांमध्ये अभिनय करत ती एक चांगली अभिनेत्री असल्याचेही मेघाने दाखवून दिले आहे.

ही काही दिवसांपूर्वी बिग बॉस मराठी सीजन 4 मधेही झळकली होती.

पण प्रेक्षकांच्या कमी वोटिंगमुळे ती या शो मधून ती लवकरच बाहेर पडली.

अभिनेत्री मेघाची सध्या तब्बेत बरी नसल्याने ती हॉस्पिटलमध्ये उपचार घेतेय.

त्यामुळे ती लवकरच बरी व्हावी आणि पुन्हा अभिनय करतांना दिसावी यासाठी तिला सुभेच्छा.