बिग बॉस मराठीच्या घरात झळकलेली प्रसिद्ध जोडी अभिनेता प्रसाद जवादे आणि अभिनेत्री अमृता देशमुख यांचे नुकतंच लग्न झालं आहे.

"आमच्या आयुष्यातील जादुई दिवस 18/11/2023" असं म्हणत अमृताने त्यांच्या लग्नातील खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केल आहे.

प्रसाद-अमृताच्या लग्नात त्यांच्या जवळचे नातेवाईक आणि काही कलाकार मित्र मंडळी हजर होते.

अमृता आणि प्रसादच्या लग्नातील त्यांच्या पारंपरिक लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. सर्वजन त्यांच्या या लुकचे कौतुक करत आहे.

बिग बॉस च्या घरात अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे यांच्यात चांगली मैत्री झाली.

खरंतर बिग बॉसच्या घरातच हे दोघे एकमेकांच्या प्रेमात असल्याचे दिसत होते.

काही दिवसांपूर्वी रोमँटिक फोटो शेअर करत या दोघांनी एकमेकांविषयीच्या प्रेमाची कबुली दिली.

तसेच जुलै महिन्यात प्रसाद-अमृताने गुपचूप साखरपुडा उरकत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता.

या ऑनस्क्रीन जोडीला खऱ्या आयुष्यात एकत्र पाहून त्यांच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

अभिनेता अभिषेक देशमुख हा अमृताचा भाऊ असल्याने तो लग्नात प्रसादचा कान पीळतांना दिसत आहे.

प्रसाद -अमृताचे लग्न झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा.