तेजश्री प्रधान सोबत झळकलेल्या अभिनेत्याच्या पत्नीला झाला हा गंभीर आजार – Rohan Gujar wife

Rohan Gujar wife: झी मराठी वरील गाजलेली मालिका ‘होणार सू मी या घरची’ यात झळकलेले सर्वच कलाकार आज प्रसिद्ध अभिनेते किंवा अभिनेत्री झाल्या आहे. या मालिकेतील कलाकार आज वेगवेगळ्या मालिकांमध्ये झळकत आहे. ‘होणार सू मी या घरची’ या मालिकेतूनच प्रचंड प्रसिद्धी मिळालेला अजून एक अभिनेता म्हणजे रोहन गुजर. हा अभिनेता आता त्याच्या वयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत आहे. त्याची खरी पत्नी एका गंभीर आजाराशी झुंज देत आहे.

जान्हवीचा भाऊ पिंट्या

मराठी अभिनेता रोहन गुजर याने ‘होणार सू मी या घरची’ या मालिकेत अभिनेत्री तेजश्री प्रधान म्हणजेच या मालिकेतील जान्हवीचा भाऊ पिंट्या हि भूमिका साकारली होती. सध्या मात्र पिंट्याच्या खऱ्या आयुष्यात आता एक दुख:द वळण आलं आहे. अभिनेता रोहन गुजर याची खरी पत्नी स्नेहल ही एका गंभीर आजाराशी लढत आहे. याबाबत तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिच्या या गंभीर आजाराविषयी माहिती दिलीय.

अभिनेत्याच्या पत्नीला गंभीर आजार

यात स्नेहलने म्हटलंय की “ऑगस्ट महिन्यात छातीत डाव्या बाजूला दुखणं सुरु झालं…हे दुखणं नवीन होतं… आधी कधीही अनुभवलं नव्हतं…पाठपुरावा करायचं ठरवलं आणि किचकट आजार surprise म्हणून समोर ठाकला… ‘स्टेज झिरो कॅन्सर’ (Ductal carcinoma in situ)…कॅन्सर च्या आधीची स्टेज…

2 मॅमोग्राम, बायोप्सी, सोनोलोकोलायझेशन, 3 नोव्हेंबर ला ब्रेस्ट कन्झर्वेशन (conservation) सर्जरी, आणि रेडिएशन अशा टप्प्यांतून उपचार सुरु आहेत…

ह्या आजाराने मला पूर्ण पकड्ण्याधीच मी त्याला एक टप्पा आऊट करू शकले याचं समाधान आहे… मनाला आणि शरीराला गेल्या महिन्याभरात खूप सहन करावं लागलंय…अजूनही लागतंय… संपूर्ण प्रक्रियेत मेंटल, इमोशनल ब्रेक डाऊन चे अनेक प्रसंग येतात…मला डॉक्टरांनी सांगितलं तेव्हा आणि surgery नंतर पहिल्यांदा जखम पाहिली तेव्हा डोळ्यांना थांबवता नाही आलं…पण जखमांकडे, स्वतःच्या शरीराविषयी जागरूक असल्याची, या प्रसंगाला छान सामोरं गेल्याची खूण म्हणून पाहिलं की गोष्टी सोप्या होतात… त्या अजून सोप्या होतात जेव्हा तुमचं कुटुंब तुमच्यासोबत खंबीरपणे उभं राहतं…या बाबतीत माहेर आणि सासर दोन्ही कुटुंबांना १०० गुण…कोणताच ड्रामा नाही, साध्या सोप्या पद्धतीने आहे ते accept केलं आणि वातावरण पूर्णपणे नॅार्मल ठेवलं….

“मीच का? माझ्यासोबतच का?” असे प्रश्न कटाक्षाने टाळायला हवेत… सहानुभूतीचा मोह आवरायलाच हवा… तरच विचारांत धैर्य, भावनांत स्थैर्य येऊ शकतं…’दिसतं तेच वास्तव’ या पलीकडे जाऊन आयुष्याचा विचार सुरु झालाय…

या सगळ्या काळात जाणवलेली अजून एक गोष्ट म्हणजे या आजाराविषयी जीवघेणा आजार म्हणून जितकं अवडंबर माजवलं जातंय तेवढी जनजागृती नाही… अजूनही या विषयी सांगणं/ बोलणं आपण टाळतो… मुली/ महिला मॅमोग्राम करणं टाळतात, हे करणं का गरजेचं आहे त्या विषयीचा awareness कमी पडतोय… हा आजार अनुवंशिक ही असू शकतो हे मला या process मध्येच कळलं… पण त्या पलीकडेही हे बदलत्या जीवनपद्धतीचं, अवाजवी stress चं प्रतिबिंब आहे… हे विसरता काम नये…तणावापासून स्वतःला दूर ठेवणं ही तुम्ही स्वतःसाठी, आयुष्याप्रति दाखवलेली basic कृतज्ञता असेल…मीही अजून हे शिकतेचं आहे…

दसरा ते दिवाळी या 15 दिवसांत शरीरातून ही कॅन्सरची नकारात्मकता काढून टाकलेय… यंदा दिवाळीत योगायोगाने खूप दिवे गिफ्ट मिळाले… मी ते ‘तिमिरातून तेजाकडे’ याचं प्रतिक मानलेत… Radiation starts today…🤞 #awareness #breastcancer” असं स्नेहलने तिच्या या सोशल मिडिया पोस्ट मध्ये म्हटले आहे.

अभिनेता रोहन गुजरची पत्नी स्नेहल ही या गंभीर आजारातुन लवकरच बरी होईल अशी आपण आशा व्यक्त करूया. यासाठी तिला खूप साऱ्या सुभेच्छा.

Share this Post:

सुजाता कराड या ब्लॉगर आणि कंटेंट रायटर आहेत. त्यांना मनोरंजन क्षेत्रात जास्त रस आहे. त्यामुळे या क्षेत्रातील चित्रपट, मालिका, कलाकार आणि इतर अपडेट्सची माहिती न्यूजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. सध्या ती मराठीजन या आमच्या वेबसाइटवर लेखिका म्हणून काम करत आहे आणि येथे मनोरंजनाच्या बातम्या आणि अपडेट्स लिहिते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a comment

Shivani Surve Wedding: अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे यांचा विवाहसोहळा Swanandi Tikekar Wedding: अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने लग्नात घेतला हा खास उखाणा Sur nava dhyas nava Top 6: यापैकी विजेता म्हणून तुमची पसंती कोणाला? Actor Druv Datar Wedding: ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिकेतील अभिनेता ध्रुवचे झाले लग्न Ravindra Berde: ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन – लक्ष्मिकांत बेर्डे यांचे बंधू या आजाराने होते त्रस्त